अबब! एकाच वेळी तीन लाख भाविकांची पंगत, चक्क ट्रॅक्टरद्वारे वाढल्या पंगती…

आज पर्यंत अनेक पंगती बघितल्या असेल परंतु अशी पंगत कधी नसेल बघितली. दरवर्षी ४००० हून अधिक सेवक या ठिकाणी निःस्वार्थ भावनेने या दिवशी सेवा देतात. गेल्या 51 वर्षापासून जन्मोस्तव साजरा केला जातो. तब्बल तीन लाखाच्या वर लोक या पंगतीत बसली होती कशी केली असेल त्यांची व्यवस्था आणि काय होता प्रसंग आज खासरेवर बघूया…

मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे ५३ वर्षाची परंपरा लाभली आहे. दरवर्षी या कार्यक्रमाचे रूप मोठे होत आहे यावर्षी तब्बल ५० एकरमध्ये हि पंगत बसविण्यात आली. आणि वाढायला हात नाही तर ट्रॅक्टरचालले एक दोन नाहीतर तब्बल २०० ट्रॅक्टर या करिता कामी आले. विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजतादरम्यान तब्बल तीन लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. या महापंगतीने सामूहिक महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. स्वामी विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्यात सामूहिक शिस्तीची भक्ती दाखवीत सोमवारी ५० एकर परिसरात एकाचवेळी ५३ पंगती बसल्या. विशेष बाब म्हणजे, कोणतीही अस्वच्छता न करता ही महापंगत उठली. सर्व भाविकांचे विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कुमकूम-चंदन तिलक लावून, धूपआरती ओवाळून पूजन केले. बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या ठिकाणी दर वर्षी विवेकानंद जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. महाप्रसादाने सांगता होणारा हा उत्सव तीन दिवस चालतो.

यामध्ये ५०० क्विंटलचा महाप्रसाद बनवला गेला. ज्यामध्ये पुरी आणि वांग्याची भाजी असा बेत होता. यंदा या महाप्रसादाला ५० हजार महिला आणि मुलींनी महाप्रसाद वाढण्याचे काम केले, तर जवळपास दोन लाखांहून अधिक भाविकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. २०० क्विंटल गव्हाची पुरी व १५१ क्विंटल वांग्याच्या भाजीच्या महाप्रसादाचे ५० एकराच्या परिसरात सुमारे तीन लाख भाविकांना २०० ट्रॅक्टर्सद्वारे वाटप करण्यात आले. त्यासाठी परिसरातील साडेतीनशे गावातील चार हजार स्वयंसेवकांसह विवेकानंद शैक्षणिक संकुलातील विविध शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगदान दिले. महाप्रसाद स्थळावरील मनोऱ्यावरून वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री हे सूत्रसंचलन करीत होते.

बुद्धिवंतांच्या कपाटात बंदिस्त असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांना व्यावहारिक पातळीवर आणून सर्वसामान्य माणसांच्या कल्याणासाठी विवेकानंद आश्रमाची स्थापना झाली. प.पु. शुकदास महाराज विवेकानंद आश्रमाच्या वतीने स्वामी विवेकानंदांची जयती अत्यंत भव्य स्वरुपात साजरी केली. अंधश्रद्धेला नाकारुन विवेकाची पेरणी इथे केली जाते. गेल्या 50 वर्षांपासून विवेकानंद यांचा जन्मोत्सव हिवरा येथे साजरा करत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी अशाच प्रकारे लाखो भाविकांना महाप्रसदाच्या रुपाने जेवण दिले जाते.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

One Comment on “अबब! एकाच वेळी तीन लाख भाविकांची पंगत, चक्क ट्रॅक्टरद्वारे वाढल्या पंगती…”

  1. बुलढाणा जिल्ह्य़ात मेहकर तालूक्यातील हिवराश्रम येथे स्वामी विवेकानंदांच्या जन्मोत्सव सोहळ्यात ट्रॅक्टर द्वारे पंगती त्याही तीन लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतला. अती भव्य व्यवस्था व असंख्य भाविकांनी घेतलेला महाप्रसादाचा लाभ म्हणजे पूर्वसंचित पूण्यफळास आले. योगदाते याना माझा शतशः प्रणाम करतो. त्याच परीसरात पाटबंधारे प्रकल्पावर सन 2005 मध्ये कार्यरत असताना जन्मोत्सव पाहीला होता त्या तुलनेत या वर्षी चा अन्नदाता व परीश्रम घेणारे सेवक वर्ग याना पुनश्च प्रणाम. ……….आपलाच स्नेही कोटलवार संत जनाई गंगाखेड़. शूभ रात्री. ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *