अनंत अंबानी याने केलेला पहिला धंदा कोणता होता? नक्की वाचा

अंबानी कुटुंबीय अत्यंत गर्भश्रीमंत आहे हे आपल्याला माहिती आहेच . अंबानी कुटुंबात त्यांच्या लहानमुलांवर योग्य संस्कार केले गेले व त्यांना लहानपणापासूनच अत्यंत सर्वसामान्यपणे वाढवले आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांच्या मुलात साधेपणा आला आहे. अनंत अंबानी हा मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा आहे आपल्या सर्वाना परिचित असेलच कि त्याने आपले वजन १८ महिन्यात घटवून एक वेगळी ओळख सर्वत्र निर्माण केली आहे. त्याने रिलायंस कंपनीला ४० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल घेतलेल्या कार्यक्रमात अनंत अंबानी याचे भाषण एकदम जोशपूर्ण पद्धतीने आक्रमक असे झाले होते. त्याचे सर्वत्र कौतुक तर कुठे टिंगल झाली. याच कार्यक्रमामध्ये त्याने एक गोष्ट सांगितली आहे कि त्याने सर्वात पहिले कोणता व्यवसाय केला…

अनंत अंबानी लहान असताना त्याचे आजोबा धीरूभाई अंबानी सोबत चौपाटीवर फिरायला गेला होता तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याला १५ रुपयाचे फुगे घेऊन दिले. अत्यंत लहान असणाऱ्या अनंत अंबानी याने घरी आल्यावर विचार केला कि आपण जे काही फुगे घेतले आहेत ते महाग घेतले आहेत. त्याने लगेच २ रुपयाचे फुग्यांचे पॉकेट आणले त्यात टाकायची हवा हि मोफतच मिळते असा विचार करून त्याने त्या फुग्यात हवा भरली आणि तो ती फुगे घेऊन विकायला घेऊन गेला. अनंत अंबानी हा त्यावेळी फक्त ६ वर्षाचा होता. व्यवसाय कसा रक्तात असतो याच्यातून दिसून आले आहे. माहिती पीडियाच्या वाचकांना सांगू इच्छतो अनंत अंबानी यांनी सांगितले कि कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो आणि व्यवसायापेक्षा कोणता धर्म मोठा नसतो. हि गोष्ट अंबानी कुटुंबीयांनी लहान मुलाच्या मनावर हि बिंबवली आहे

आज अनंत अंबानी मध्ये रिलायन्स परिवार हा धीरूभाई यांना पाहतो . एखादया व्यक्तीची टिंगल करून आपल्याला थोडी मज्जा मिळेल पण त्या व्यक्तीमधील काही चांगले गुण घेऊन आपण जगलो तर त्याच्या सारखे नाही पण थोडे तरी आपण यशस्वी होऊ .. खाली अनंत अंबानी आणि शाहरुख खान यांनी हा किस्सा स्वःत सांगितला आहे तो व्हिडीओ मध्ये पहा

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
मुकेश-नीता अंबानी आपल्या मुलांना किती पॉकेट मनी द्यायचे, वाचून आश्चर्याचा धक्का बसेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *