महाराष्ट्रातील पहीली सर्वात मोठी दंगल ज्याची वॉशिंग्टन पोस्टने घेतली होती दखल…

भारतात दंगलीचा इतिहास खूप जुना आहे. सांप्रदायिक दंगलीचे सत्र भारतासाठी नवीन नाही. आता पर्यंत देशात अनेक मोठमोठ्या सांप्रदायिक दंगली झाल्या आहेत. महाराष्ट्र सुद्धा यामध्ये मागे नाहीये. महाराष्ट्रात सुद्धा अनेक दंगलीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. पण आज आपण महाराष्ट्रात घडलेली पहिली दंगलीची घटना बघणार आहोत. 1927 साली नागपूरमध्ये झालेल्या दंगलीची दखल आंतरराष्ट्रीय मीडियाने सुद्धा घेतली होती. नागपूरची दंगल ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दंगल म्हणून ओळखली जाते. ब्रिटिश काळात वेगवेगळ्या शहरात होत असलेल्या 1920 सालातल्या दंगलीचा भाग नागपूरची 1927 ची दंगल होती. नागपूर त्यावेळी मध्य प्रांत आणि बेरारची राजधानी होते. 4 सप्टेंबर 1927 रोजी ही दंगल घडली होती. 4 तारखेच्या सकाळी महालक्ष्मीची एक मिरवणूक निघाली होती जी महालजवळ आल्यावर मुस्लिमांनी अडवली होती असे म्हंटले जाते. दुपारी हिंदूंच्या परिसरात हिंसाचार सुरू झाला जो की सलग तीन दिवस चालू राहिला.

दंगलीची पार्श्वभूमी-

1920 मध्ये मुस्लिम आणि हिंदू समाजात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. याचंच परिवर्तन वेगवेगळ्या शहरात दंगलीमध्ये झाले. त्यावेळी भारतातील परिस्थिती खूपच बिकट झाली होती. 1923 साली 11 दंगली, 1924 मध्ये 18 दंगली, 1925 मध्ये 16 दंगली, 1926 मध्ये 35 दंगली भारतातील वेगवेगळ्या शहरात झाल्या. एवढेच नव्हे तर मे 1926 ते एप्रिल 1927 या 12 महिन्यात तब्बल 40 दंगली विविध शहरात झाल्या.

जास्तीत जास्त दंगली या बंगाल, पंजाब आणि युनायटेड प्रॉव्हिसन्स( युपी) मध्ये झाल्या होत्या. ऑगस्ट 1927 मध्ये झालेली लाहोरची दंगल या सर्व दंगलीमध्ये भयानक आणि मोठी दंगल म्हणून ओळखली जाते.

1923 साली झालेली दंगल ही हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी मस्जिद समोरून मोठ्याने म्युजिक लावून गेल्याने झाली होती. मुस्लिम समुदायाने यावर आक्षेप घेतला होता. याच दंगलींमुळे के बी हेगडेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. ख्रिस्तोफ जॅफेलोट यांनी आपल्या हिंदू नॅशनलिस्ट मोव्हमेंट आणि इंडिअन पॉलिटिक्स या पुस्तकात सांगितले आहे की 1927 मध्ये गणेशोत्सवात मस्जिद समोर ड्रम वाजवण्याच्या कारणावरून दोन समाजात वातावरण खराब झाले होते, यामुळे दंगल भडकली.

नागपूरची दंगल-

4 सप्टेंबर 1927 ला सकाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक महल भागातील मस्जिद समोरून जात होती. त्यावेळी ती मिरवणूक तिथे अडवण्यात आली आणि पुढे जाण्यापासून अडवण्यात आले. दुपारी या प्रकारानंतर काही मुस्लिम युवक हिंदु भागात काही शस्त्रे घेऊन घोषणा देत घुसले.

या युवकांनी हेगडेवार यांच्या घरावर दगडफेक केली. त्यावेळी हेगडेवार हे शहरातून बाहेर होते. त्यावेळी आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी याचा प्रतिकार करत प्रतिहल्ला केला. आयएसएसचे कार्यकर्ते महल मस्जिद भागात काठ्या घेऊन उतरले आणि याचं रूपांतर दंगलीत झालं. द वॉशिंग्टन पोस्ट या आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टनुसार या दंगलीत 22 जनांचा मृत्यू तर 100 हुन अधिक लोकं जखमी झाले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

One Comment on “महाराष्ट्रातील पहीली सर्वात मोठी दंगल ज्याची वॉशिंग्टन पोस्टने घेतली होती दखल…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *