राणादाकडे असलेल्या सर्वात महागड्या गाडीची किंमत जाणून तुम्ही थक्क व्हाल…

झी मराठी चॅनेलवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता हार्दिक जोशीला आपण आता राणादा म्हणूनच ओळखतो. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांना भुरळ घातली. राणादाचा चालतंय की डायलॉग तर घराघरात जाऊन पोहचला. राणादा म्हणजेच हार्दिक जोशीने यापूर्वी अनेक हिंदी मराठी चित्रपटात सुद्धा काम केलेले आहे. त्यामध्ये सन ऑफ सरदार, हापूस, क्राईम पट्रोलचा समावेश आहे. राणाचे पात्र तुझ्यात जीव रंगला मालिकेत खूप रांगडे दाखवले आहे. त्याची बोलण्याची स्टाईल एकंदरीत त्यांची पूर्ण पर्सनॅलिटी खूप आकर्षक दाखवली आहे.

सध्याची तरुणाई त्याला फॉलो करत असल्याचे सुद्धा दिसून येते. लवकरच हार्दिक एका मराठी सिनेमातून मोठ्या पडद्यावर सुद्धा झळकणार आहे. जर्नी प्रेमाची म्हणून सिनेमात तो नायकाच्या नव्हे तर खलनायकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे. राणादाच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला अनेकांना उत्सुकता आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेसाठी तो एका दिवसासाठी 18000-20000 रुपये मानधन घेत असल्याचे कळते.

राणादा ला महागड्या गाड्यांचा चांगलाच शौक आहे. त्याच्या गाड्यांची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा बघायला मिळते. त्याच्या कार कलेक्शन मध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. पण सध्या त्याच्या एका बाजूला पांढऱ्या रंगाच्या गाडीचा फोटो चांगलाच वायरल झालेला बघायला मिळाला. ती गाडी आहे सुप्रसिद्ध जगुअर कंपनीची. जगभरात नावाजलेला आणि महागड्या गाड्या असलेला जगुअर हा ब्रँड आहे. राणादा कडे जगुअर कंपनीची लेटेस्ट मॉडेल असलेली कार आहे. या गाडीची किंमत 1.97 कोटी आहे. महाराष्ट्रात ही महागडी कार खूप कमी लोकांकडे असल्याचे कळते.

आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहचलेला राणादा अशाप्रकारे पुन्हा एकदा आपल्या महागड्या गाडीमुळे प्रेक्षकांमध्ये गेला आहे. त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये अशीच दिवसेंदिवस वाढ व्हावी यासाठी व त्याच्या अभिनय क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
सर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…
लागीर मधील राहुल्या प्रत्यक्षात रडतानाचा व्हिडीओ लिक झालाय, का रडतोय राहुल्या ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *