हा व्हीडीओ बघुन विश्वास बसणार नाही की हे काश्मीर आहे का जालना…

हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला होता. रविवारी हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. रविवारी सकाळी मराठवाडा, विदर्भातील काही शहरांमध्ये अवकाळी पाऊसासह तुफान गारपीट झाली. खरीप पिकावर आलेल्या संकटातून बळीराजा सावरत असतानाच या अवकाळी गारपिटीने रब्बी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गारपिटीचा सर्वात जास्त तडाखा जालना जिल्ह्याला बसला आहे. जालना जिल्ह्यातील मंठा, जाफराबाद, अंबड, घनसावंगी तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई, वडवणी, माजलगाव तालुक्यात आणि परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याला या गारपिटीचा सर्वात जास्त फटका बसला आहे. तूर, हरभरा, गहू, ज्वारी या काढणीला आलेल्या पिकांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट पुढील 48 तास कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

जालना जिल्हात काश्मीर सदृश परिस्थिती-

या गारपिटीचा फटका सर्वात जास्त फटका जालना जिल्ह्याला बसला असून प्रचंड नुकसान झाले आहे. जालना आणि मंठा तालुक्यात गारपीटीनंतर सर्वत्र गारांचा अक्षरशः खच पडला होता. यात गारांचा आकार हा दीडशे ते दोनशे ग्राम असल्याने अनेकजण जखमी सुद्धा झाले आहेत. सर्वत्र गारांचा खच साचल्याने बऱ्याच ठिकाणी काश्मीरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. बघूया याचाच प्रत्येय देणारा हा जालना जिल्ह्यातील गारपिटीनंतरचा हा व्हीडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *