इंटरनेटवर दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या प्रियाचा नवीन व्हिडीओ बघितला का..

लाखो तरुणाच्या ह्रद्ययाचा ठोका चुकवणाऱ्या प्रिया वरीअरने इंटरनेटवर दोन दिवस धुमाकूळ घातला. मागचे 2 दिवस इंटरनेटवर सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय बनलेले आहे तिचे नुकतेच रिलीज झालेले मल्याळम गाणे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर प्रचंड वायरल झालेला आहे. या गाण्यातील मुलीने आपल्या हटके एक्सप्रेशनने अनेक लोकांना भुरळ घातली आहे. हा व्हिडीओ रिलीज होऊन काही तासच उलटले असताना या व्हिडीओला करोडो लोकांनी पाहिले आणि शेअर केले आहे.

अभिनेत्री प्रिया वरीअरचा हा पहिलाच सिनेमा आहे. ओरु आदर लव्ह या सिनेमातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ओमर लुलू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. प्रियाने या गाण्यात जे एक्सप्रेशन दिले आहेत खूपच खास होते. माणिक्य मलाराया पूवी असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यामध्ये प्रिया हायस्कूल मधील क्रश दाखवण्यात आली आहे. PMA जब्बार यांचे शब्द असलेलं हे गाणं शान रहमान यांनी कंपोज केले आहे तर विनीत श्रीनिवासन यांनी हे गाणं गायले आहे.

प्रियाला या गाण्यामुळे चांगलीच प्रसिध्दी मिळालेली असताना आज याच सिनेमातील तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हीडीओ मध्ये सुद्धा तिचे एक्सप्रेशन खूपच खास आहेत. तिच्या या एक्सप्रेशन मुळे प्रिया वरीअर हे नाव अजून काही दिवस इंटरनेटवर धुमाकूळ घालणार यात शंकाच नाही. चला तर खासरेवर बघूया प्रियाचा हा नवीन व्हीडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *