श्रीदेवी यांचा मृत्यू होण्याअगोदर अमिताभ यांना कशाप्रकारे लागली होती चाहूल?

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांनी वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी दुबईत त्यांच्या भाच्याच्या लग्नाला गेल्या होत्या. या लग्न सोहळ्यानंतर दुबईतच त्याचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेकांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र श्रीदेवी यांच्या निधनाच्या काही तास आधी अमिताभ बच्चन यांनी केलेलं एक ट्विट सध्या चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांना काही तरी अघटीत घडणार याची चाहूल आधीच लागली होती का? असे अनेक प्रश्न आता सर्वांच्या डोक्यात घोंगावत आहेत.

T 2625 – न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है !!, असं ट्विट रात्री १ वाजून १५ मिनिटांनी अमिताभ बच्चन यांनी केलं होतं. त्यानंतर रात्री २ वाजून १४ मिनिटांनी फिल्मफेअरनं अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी दिली. भल्या सकाळी श्रीदेवीच्या चाहत्यांना मिळालेली ही बातमी अत्यंत धक्कादायक होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं. अमिताभ बच्चन यांना श्रीदेवी यांचं निधन होणार असं माहीत होतं का ? असा प्रश्न लोकांच्या मनात तयार झाला आहे.

अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईमध्ये ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे, ती ५५ वर्षांची होती. तिला आलेला ह्रदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीदेवी तिचा नवरा बोनी कपूर आणि लहान मुलगी ‘खुशी’ सोबत दुबईला मोहीत मारवाह याच्या लग्न समारंभासाठी गेली होती. तिची मोठी मुलगी जान्हवी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याने ती या लग्नसमारंभाला जाऊ शकली नव्हती.

श्रीदेवी विवाहसोहळ्यादरम्यान बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि बेशुद्ध झाली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाने तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान करत मृत घोषित केलं. बोनी कपूर यांचा लहान भाऊ संजय कपूर याने या वृत्ताला दुजोरा दिला असून हिंदुस्थानी प्रमाण वेळेनुसार रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान श्रीदेवीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *