बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये प्रचंड शोककळा…

अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवलेल्या करोडो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवी यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या या अकाली जाण्याने संपूर्ण बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. श्रीदेवी या अवघ्या 54 वर्षाच्या होत्या.

श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असा परिवार आहे.

श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात लहान असतानाच सुरु केली होती. 1978 साली सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले. निर्माते दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी विवाहानंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्या होत्या. त्यानंतर 2012 साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट-

सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, जुली, सोलावा, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. श्रीदेवी यांना खासरेकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *