ज्या मुलामुळे प्रिया झाली फेमस त्याच मुलाला विसरले जग, जाणून घ्या प्रियासोबत दिसणारा मुलगा कोण आहे…

मागच्या 3-4 दिवसात प्रिया प्रकाश वरीअर या नावाने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला. प्रियाचा एक फक्त 26 सेकंदाचा व्हिडीओ एवढा वायरल झाला ली ती रातोरात स्टार बनली. पण प्रियाच्या नादात लोकं त्या मुलाला विसरले जो प्रियाने डोळा मारल्यानंतर रिऍक्शन देतो. खासरेवर जाणून घेऊया या मुलाबद्दल ज्याच्यामुळे प्रिया एवढी फेमस झाली.

ओरु आदर लव्ह च्या गाण्यात प्रियासोबत दिसलेल्या मुलाचं नाव आहे रोशन अब्दुल रऊफ. रोशन हा एका थिएटर आर्टिस्ट सोबत स्टेज परफॉर्मर सुद्धा आहे. D3 रिऍलिटी शोमध्ये त्याला चांगल्या अभिनयासाठी अभिनेत्री शोभनाच्या हस्ते सन्मानित सुद्धा करण्यात आलेले आहे.

रोशन सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह असतो. रोशन आणि प्रियाचा हा पहिलाच सिनेमा आहे. रोशनने त्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक कॉमेडी व्हिडीओ शेअर केले आहेत. रोशनने इन्स्टाग्रामवर अनेक डबस्मॅशचे व्हिडीओ सुद्धा अपलोड केलेले आहेत. रोशन अब्दुल रऊफ हा एक चांगला अभिनेता आणि डांसर आहे. रोशन आणि प्रियाचा हा पहिलाच सिनेमा 3 मार्चला रिलीज होणार आहे. शान रहेमान याने कंपोज केलेलं गाणं वायरल झाल्यामुळे हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला आहे.

शाळेतील प्रेम दाखवलेल्या या गाण्याला युट्युवर 3 दिवसात कोट्यवधी लोकांनी पाहिले आहे. थोड्याच कालावधीत हे गाणं ट्रेंडिंगला पोहचले. प्रियाच्या अंदाजाने सर्वाना घायाळ करून टाकले आहे. प्रिया वरीअर ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *