उदयनराजेंवर असलेल्या प्रेमापोटी चहावाल्याने केले असे काही की जाणून थक्क व्हाल…

उदयन महाराज बस नामी काही है ! हे आणखी एक वेळा सिद्ध झाले आहे. महाराजा प्रती असलेले सातारकरांच्या मनातील प्रेम अनेक वेळा वेगवेगळ्या प्रसंगातून त्यांनी दाखवून दिलेले आहे. असाच काही प्रसंग आज चंदू चहावाला यांनी दाखविला आहे जो वाचून आणि बघून तुमची छाती अभिमानाने फुगेल तर बघूया खासरेवर काय केले चंदू चाहवाल्यानी..

घाटाई कडे जात असताना गणेश मंदिराच्या पुढील चडाला एक तरुण मागे सॅक लावून चालत चालला होता महाराजांनी गाडी थांबविण्यास सांगितली आणि गाडी थांबताच जिप्सी न ओळखणाऱ्या त्या तरुणाने लक्ष दिले नाही परंतु चक्क मा.खा.छञपती महाराज उदयनराजे भोसले बोलवत आहेत हे पहाताच हा तरुण धावत मुजरा करत काही सुचत नाही अश्या अवस्थेत जवळ आला ,महाराजांनी त्याला विचारले कोठे चाललाय आणि चालत का ? तो तरुण उत्तर देण्यापूर्वीच छत्रपती उदयनराजे यांनी त्याला गाडीत घेतले आणि त्याला कॉलेज ला काय मदद हवी आहे का ?विचारले चालत का चालला आहे ह्या प्रश्नावर गाडी चुकल्याचे कारण सांगणाऱ्या ह्या तरुणास छ उदयनराजे यांनी two wheeler गाडी घेऊन दिली. असा मनाचा मोठेपणा दाखविला अशे अनेक प्रसंग राजेंचे आहे परंतु मोठ्या मनाच्या राजकरिता सामान्य माणसाने मनाचा मोठेपणा दाखवीने तेवढेच आवश्यक आहे.

तर झाले असे कि चंदू चहावाला हा प्रसिद्ध सातारा शहरातील चहा आहे दरवेळेस महाराजांच्या वाढदिवसाला काहीना काही नवीन उपक्रम करत असतात. साताऱ्याचे सुप्रसिद्ध चंदू चहवाले अमृत तुल्य सातारा बस स्थानक शेजारील चहाचे दुकान श्री चंद्रकांत इंगवले चंदू चहावाले यांनी उदयनराजेंच्या जन्मदिवसानिमिता 50 हजार लोकांना चहा फ्री देण्याचे मानस केले आहे आज सकाळ पहाटे 4 वाजले पासून त्यांनी कमीत कमी ४० हजार लोकांना चहा वाटलं आहे ह्यातून एक जाणवता की राजा वरचे प्रेम आणि त्याच्या वरची श्रद्धा ही अपरमापार आहे आज चंद्रकांतदादा नी अमृत तुल्य देऊन ज्या शुभेच्या दिल्या आहेत त्याची गणना होऊ शकत नाही. खालील विडीओ मध्ये आपण बघू शकता कि कश्या प्रकारे त्यांनी हा उपक्रम राबविला आहे.

मनाची श्रीमंती पुढे सगळ छोट आहे हे परत एकदा या वरून सिद्ध झालेलं आहे. त्यांच्या मुलाने दिलेल्या मुलाखतीत तो सांगतो महाराजांनी शुभेच्छाच्या स्वीकार करावा आणि महाराज ह्या शुभेच्छाचा स्वीकार करणार यात कुठलीही शंका नाही. सगळेच जण फुलांच्या माळांनी आशीर्वाद व शुभेच्छा देतात पण ही आगळी वेगळी भेट उदयन राजे च्या वाढदिवसा निमित्ताने महाराज खूप खूप शुभेच्छा..
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *