पेट्रोलमध्ये अनेक पंपावर आढळले पाणी, जाणुन घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य..

सध्या सोशल मिडीयावर पेट्रोल पंपवरील अनेक विडीओ वायरल झालेले दिसतील ज्यामध्ये पंपावर पेट्रोल सोबत पाणी येत आहे. सदर विडीओमुळे पंपावर भयंकर गोंधळ झालेला दिसतो. परंतु अनेक पंपावर पेट्रोलमध्ये पाणी का आढळत आहे यावर आम्ही काही संशोधन केले व निष्कर्ष धक्कादायक आहे. चला तर खासरेवर आज बघुया सदर घटना पेट्रोल पंपवाले पैसे कमवायला करीत आहेत का दुसऱ्या कारणामुळे होत आहे.

पेट्रोल हे पाण्यापेक्षा हलके असल्याने ते सहज पाण्यावर तरंगते त्यामुंळे आपण सहज पेट्रोल व पाणी ओळखु शकतो. या विडीओमध्येही वर पेट्रोल व खाली गढुळ रंगाचे पाणि दिसेल. पेट्रोल पंपवाले चोरी करत आहेत हे कारण सांगण्यात येत आहेत. परंतु यात आरोप करणाऱ्याचाही दोष नाही त्यांना या मागचे खरे कारण माहिती नाही आहे. तर यामागचे खरे कारण पुढिल प्रमाणे आहे.

भारत सरकारच्या नियमानुसार पेट्रोलचे भाव आवाक्यात आणन्याकरीता सरकारने एक निर्णय घेतला होता. पेट्रोलमध्ये ५% इथेनाल मिश्रित करण्यात आले होते. सद्या इथेनालचे पिरमाण पेट्रोल व डिझेल मध्ये वाढविण्यात आलेले आहे. इथेनाल हे स्वस्त असुन सहज उपलब्ध होते. परंतु शुध्द इथेनाल हे पाण्याकडे आकर्षित होणारे असते. एवढेच नाही तर वातावरणातील पाणि इथेनाल ओढुन घेतो. त्यामुळेच १००% शुध्द इथेनाल हे विक्रीस मिळत नाही. जास्तीत जास्त ९९.२% एवढे शुध्द इथेनाल विक्रीस आहे. जर पेट्रोल टैंकचा संपर्क पाण्याशी अथवा बाहेरील हवामानासोबत आला तर पेट्रोल व इथेनाल वेगळे होते.

पंपावरील टैंक हि सदोष असल्यास व वातावरण दमट असल्यास हा प्रकार घडु शकतो. त्यामुळे इथेनाल व पेट्रोल हे वेगवेगळे होतात. ह्या कारणामुळे अनेक पेट्रोल पंपावर हे प्रकार घडत आहे किंवा घडविल्या जात आहे याबात सांगता येत नाही.

आपल्याला हि माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *