ईस्तानबुल मधील चाहत्याची श्रीदेवीला आगळीवेगळी श्रद्धांजली, कॉफीत बनवला श्रीदेवीचा चेहरा…

24 फेब्रुवारीला बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचे दुबईत निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलीवूडवर आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. श्रीदेवी यांचे भारतातच नव्हे तर विदेशातही प्रचंड चाहते होते. सध्या त्यांच्या चाहत्याने दिलेल्या आगळ्यावेगळ्या श्रद्धांजलीचा व्हिडीओ म्हणून चांगलाच व्हायरल झाला आहे. अनुपम खेर यांनीही आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या इस्तानबुल येथील एका चाहत्याने तयार केला आहे असा दावा करण्यात येत आहे. पण हा व्हिडिओ मागच्या वर्षीचा असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ साऊथ आफ्रिकन कॉफी हाऊस ग्लोरिया जीन्स कॉफीने महिला दिनाच्या प्रमोशननिमित्ताने आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *