बिग बॉस ११ ची विजेता मराठमोळ्या शिल्पा शिंदे विषयी काही खासरे गोष्टी

बिग बॉस ११ च्या ग्रँड फिनाले कोण जिंकणार असा सर्वाना प्रश्न पडला होता पण बिग बॉसचा ११ चा ताज याची उत्सुकता आता संपली आहे. मराठमोळी शिल्पा शिंदे हि बिग बॉस ११ ची विजेती ठरली आहे. तब्बल ४७ टक्के मते घेऊन ती विजयी झाली आहे. आकाश ददलानी आऊट झाल्या नंतर घरात चार फायनल कंटेस्टेंट उरले होते. हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि पुनीश शर्मा. सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकाराला सपोर्ट करण्यासाठी फॅन्स अॅक्टिव्ह पण झाले होते. सोशल मीडियावर बिग बॉसच्या विनरच्या वोटिंगला ट्रेंडमध्ये शिल्पा शिंदेचे नाव सगळ्यात वरती आहे.

शिल्पाचे फॅन्स इतर कंटेस्टेंट पेक्षा जास्त आहेत यामध्ये दुम्मत नाही. शिल्पाच्या फॅन्स बद्दल बोलयाचे झाले तर सलमान खानच्या घरात सुद्धा सलमानची फॅन आहे. सलमान कोणाला सपोर्ट करतोय याचा खुलासा झाला नाही मात्र सलमानची आई शिल्पा शिंदेच्या परफॉर्मेंसवर खूप खूश होती. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार सलमानची आईला वाटायचे की या सीझनची विजेती शिल्पा शिंदे व्हावी. काल ट्विटर वर शिल्पा शिंदेच्या समर्थनार्थ ट्रेंड करण्यात आला दीड मिलियन हून अधिक ट्वीट करून हा ट्रेंड करण्यात आला या ट्रेंड मुळे सध्या शिल्पा जिंकू शकते असे बऱ्याच जणांना वाटते. दरम्यान काही दिवसांपूर्वी वुई लव्ह शिल्पा शिंदे असा हॅशटॅगचा वापर करत तिच्या फॅन्सने अनेक ट्वीट केले होते.तो हि ट्रेंड हिट झाला होता.

जाणून घेऊया बिग बॉस ११ ची विजेता मराठमोळ्या शिल्पा शिंदे विषयी काही खासरे गोष्टी

शिल्पा शिंदे नाव घेतलं की कोणीही विचारेल की कोण ही? पण भाभीजी घर पे है मधील अंगुरी भाभीचं नाव मात्र घेतलं की तिचं पात्र डोळ्यासमोर उभे राहते. अंगुरी भाभी म्हणजेच मराठमोळी शिल्पा शिंदे अंगुरी भाभी या भूमिकेमुळे घराघरात पोहचली.

२८ ऑगस्ट १९७७ ला जन्मलेली ४० वर्षीय शिल्पा शिंदे मुंबईची रहिवासी आहे. तिचे शिक्षण ही मुंबईत झालेले आहे. तिने सायकॉलॉजी मध्ये ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतलेले आहे. शिल्पाला लहानपणीपासून डान्सची खूप आवड होती.

शिल्पा शिंदेने या मालिकेशिवाय भाभी, मायका, संजीवनी, चिडीया घर, हातीम, मिस इंडिया या मालिकांमध्येही काम केले आहे. शिल्पाने भाभीजी घर पे है मालिका सोडल्यानंतर तिच्यावर बरेच आरोप करण्यात आले होते. पण प्रेक्षकांचे प्रेम मात्र तिच्यावर कायम राहिले.

उलट शिल्पाला या वादाच्या आणि आरोपांच्या जोरावर बिग बॉस या गाजलेल्या रिऍलिटी शोमध्ये स्थान मिळाले. हा शो जिंकून तिने परत एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बिग बॉस चे विजेतेपद तिच्या करिअर साठी टर्निंग पॉईंट ठरणार यात मात्र शंका नाही.

शिल्पाने दोन तेलगू सिनेमात सुद्धा काम केले आहे. यामध्ये दसरी नारायण राव यांचा छिना आणि सुरेश वर्मा यांच्या शिवानी या सिनेमांचा समावेश आहे. शिल्पा शिंदेने १९९९ मध्ये नकारात्मक भूमिकेने अभिनयाची सुरुवात केली होती. २०१७ मध्ये शिल्पाने पटेलचा पंजाबी सिनेमा शादी मध्ये एक आयटम सॉंग सुद्धा केले आहे. शिल्पा शिंदे रोमित राज सोबत बरेच दिवस रिलेशनशिप मध्ये होती. ते बरेच दिवस सोबत राहायचे पण ते सध्या वेगवेगळे राहतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *